👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१४ वे, रूपके विरहिणी अभंग ८९५
सांवळी प्रतिमा घेउनी सुकुमार । खेळत सुंदर गोकुळी रया ॥१॥ त्या रूपें वेधिलें काय करूं माय । अवघें निर्गुण होय पाचारितां ॥२॥ मीपणा ठाव नुरेची पैं सर्वथा । प्रपंचाची कथा ब्रह्म जाली ॥३॥ बाप निवृत्तिराजे दाविताती खुणा । नाम नारायणा पाठ किजे ॥४॥
अर्थ:-
शामसुंदर सुकुमाररूप घेऊन तो भगवान श्रीकृष्ण गोकुळांत खेळत आहे.त्या रूपाला बघून मनाला वेध लागतो. तेथून मन माघारी फिरतच नाही काय करावे. बोलावू गेले तर तर तोच निर्गुण होऊन जातो. अहंकारा मुळेच प्रपंच जीवाचे बोकांडी बसला आहे. परंतु विचार करणाऱ्याच्या अहंभावाचा पत्ताच नाहीसा होऊन प्रपंचाची वार्ताच च ब्रह्मरूप होऊन जाते.ही परमात्मस्वरूपाची खूण दाखविणारा श्रीगुरू निवृत्तीरायच आहे. त्या खुणेप्रमाणे नारायणाचे नामाचे पाठ करणे उपासकाचे कर्तव्य आहे. असे माऊली सांगतात.
