👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-३ रे, नामसंकीर्तन महात्म्य अभंग ८५
दसविये द्वारी वोहट पडिला । नेणता पैं गेला पहावया ॥ अवचिती वाट सांपडली पंथे । ब्रह्मनाम तेथें आलें हातां ॥ ज्ञानदेवा गीती निशाणी नाम । समाधि संजीवनी तारक हरि ॥
अर्थ:-
दहा इंद्रियांची दहा द्वारे ओस पडली व त्याला पहायला मन धावले. ते ब्रह्मनाम अवचित कळले व निजपंथाची वाट सापडली.ते नामच संजिवन समाधी पर्यंत पोहचवते तेच नाम मी गात आहे असे माऊली ज्ञानदेव सांगतात.