ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 86

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-३ रे, नामसंकीर्तन महात्म्य अभंग ८६

भावाचेनि बळें घेतलें वैकुंठ । हरिनाम नीट वैकुंठ मार्ग ॥ सोपें हो साधन साधावयालागीं । नलगे उपाधि नाना मतें ॥ ज्ञानेसहित ज्ञान विज्ञानेंसि धन । वृत्तीचें समाधान निवृत्ती करी ॥ शांती दया क्षमा करुणानिधि प्रेम । नेउनि परब्रह्म भावे मिळती ॥ ज्ञानदेवो सांगे भावो मीनला गंगे । सुस्नात सर्वांगे हरि गंगा ॥

 अर्थ:-

 हरिनामाचा सरळ वैकुंठमार्ग आहे. भावाच्या बळावर नामाने वैकुंठ साधता येते. सोपे असलेले नामसाधन असुन त्यासाठी वेगळा उपाधी व मते असणे गरजेचे नाही. त्यामुळे ज्ञानाचे ज्ञान व संसाराचे विज्ञान समजते असे सांगुन निवृत्तिनाथ वृत्तीचे समाधान करतात. दया क्षमा शांती करुणा व प्रेम ह्या सर्व भावांचे एकत्रित करुन नाम घेतले तर परब्रह्म प्राप्त होते. असा भाव एकत्रित मनावर बिंबवल्यामुळे त्या नामगंगेत मी सर्वांग स्नान करुन घेतले असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading