👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-२ रे, हरिपाठ अभंग ७७
वेदशास्त्रपुराण श्रुतिचे वचन । एक नारायण सार जप ॥१॥ जप तप कर्म हरिविण धर्म । वाउगाचि श्रम व्यर्थ जाय ॥२॥ हरिपाठीं गेले ते निवांतचि ठेले । भ्रमर गुंतले सुमनकळिके ॥३॥ ज्ञानदेवां मंत्र हरिनामाचे शस्त्र । यमें कुळगोत्र वर्जियेले ॥४॥
अर्थ:-
एक हरिनामच साररुप आहे हेच वेद शास्त्रांचे प्रमाण व श्रुतीचे वचन आहे. जप तप हे कर्ममार्ग आहेत त्यामुळे वाऊगा श्रम होतो व शेवटी सगळे व्यर्थ ठरते एक हरिनामच खरा धर्म आहे. भ्रमर जसा फुला मध्ये निवांत बसुन असतो तसे हरिनाम करणारे निवांत राहतात. हरिनामाचा मंत्र म्हणुन तेच शस्त्र केले तर यम त्याच्या कुळाकडे फिरकत नाही असे माऊली सांगतात.
