👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-२ रे, हरिपाठ अभंग ७८
काळ वेळ नाम उच्चारितां नाही । दोन्ही पक्ष पाहीं उद्धरती ॥१॥ रामकृष्ण नाम सर्व दोषां हरण । जडजीवां तारण हरि एक ॥२॥ हरिनाम सार जिव्हा या नामाची । उपमा त्या देवाची कोण वानी ॥३॥ ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ । पूर्वजां वैकुंठ-मार्ग सोपा ॥४॥
अर्थ:-
हरिनाम घेण्यास काळवेळ पाहण्याची गरज नाही त्याच्यामुळे इह व परलोक ह्या दोन्हीत जीव उध्दरतो. रामकृष्णनामामुळे सर्व दोषांचे हरण होते. जडजीवाना तारण हे हरिनाम असते. हरिनाम हे सर्व साधनांचे सार असुन ते घेणाऱ्याच्या दैवाला पार नाही. जर हा हरिपाठ करत राहिले तर पुर्वजांना ही वैकुंठ प्राप्त होते असे माऊली सांगतात.
Previous Post
ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 77
Next Post
ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 79
