👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-२ रे, हरिपाठ अभंग ७१
नित्य सत्य मित हरिपाठ ज्यासी । कळीकाळ त्यासी न पाहे दृष्टी ॥१॥ रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप । पापाचे कळप पळती पुढें ॥२॥ हरि हरि हरि मंत्र हा शिवाचा । म्हणती जे वाचा तयां मोक्ष ॥३॥ ज्ञानदेवा पाठ नारायण नाम । पाविजे उत्तम निजस्थान ॥४॥
अर्थ:-
जो सतत व नित्यनेमाने हरिपाठ करतो त्याच्यावर कळीकाळाची दृष्टी पडत नाही. ह्या रामकृष्णनामाचे कळपासारखे घनदाट उच्चार झाले की तुमचे पाप त्याच्या पुढे पळत सुटते. हरि हा मंत्र जो शिवा प्रमाणे जपत असतो त्याला मोक्ष प्राप्त होतो.ह्या नारायण नामाचा पाठ केला त्याला उत्तम निजस्थान प्राप्त होते असे माऊली सांगतात.