ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 72

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-२ रे, हरिपाठ अभंग ७२

एक नाम हरि द्वैतनाम दुरी । अद्वैत कुसरी विरळा जाणें ॥१॥ समबुद्धि घेतां समान श्रीहरि । शमदमांवरी हरि झाला ॥२॥ सर्वांघटीं राम देहांदेहीं एक । सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी ॥३॥ ज्ञानदेवा चित्तीं हरिपाठ नेमा । मागिलिया जन्मा मुक्त झालों ॥४॥

अर्थ:-

त्या एकतत्व नामाची कास धरली की द्वैत राहात नाही व परमात्म्याचे अद्वैतरुप प्राप्त होते.जर समबुध्दीने हे हरिनाम घेतले तर तो शम दम मनोनिग्रह तितिक्षा ह्या गुणाना प्राप्त होतो.ज्या प्रमाणे पाण्याने भरलेले अनेक माठ ठेवले तर त्यात सुर्यबिंब प्रत्येक माठात दिसते त्या प्रमाणे तो सर्व जींवामध्ये दिसतो. नित्यनेमाने हरिनामपाठ केला तर मागिल जन्माचा पापपुण्यापासुन मुक्त होतो असे माऊली म्हणतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading