👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६८५
तनुमनुधनें पूज्य पैं केलें । आत्मलिंग पूजिलें बाइये वो ॥१॥ तंव निराकार देखिलें निराकार देखिलें । मी पूजनलिंग तिन्ही हरपलें ॥२॥ रखुमादेविवरू निजलिंग विवळलें । अवघी अवघे ठायीं सामावलें बाईये वो ॥३॥
अर्थ:-
मी तन, मन, धनाने आत्मलिंगाचे पूजन केले. त्यावेळी निराकार परमात्म वस्तुचे दर्शन मला घडले. त्यामुळे पूजा करणारा मी, पूज्य लिंग आणि त्याची पूजा ही त्रिपुटी नाहीसी होऊन गेली. रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल, हे कोणी आत्मलिंग तें आत्मलिंग प्रगट झालें. अशा प्रगट झालेल्या आत्मलिंगाचे ठिकाणी मी एकरूप होऊन गेले. असे माऊली सांगतात.
Previous Post
ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.684
Next Post
ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.686
