ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.656

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६५६

कापुराची सोय कापुरीची माय । परतोनी धाय ने घे तैसी ॥१॥ असोनी नसणे सर्वत्री दिसणे । हरिप्रेम घेणे परे आम्हां ॥२॥ सुखरूप असतांचि शीव । हरपले भाव विज्ञानेसी ॥३॥ बापरखुमादेविवरू विठ्ठलु सुखाचा । तरंगुही नावांचा परतेचिना ॥४॥

अर्थ:-

कापुराचा सुगंध जसा कापुराच्या ठिकाणीच असतो. त्याप्रमाणे परमानंदरूप झालेली अंतःकरणवृत्ति परमानंदस्वरूपाच्या ठिकाणीच असते. पुन्हां परतून सत्यत्वाने संसाराकडे बघत नाही. आत्मस्वरूप सर्व संसारात असून नसल्यासारखे असले तरी भातिरूपाने सर्वत्र दिसत असतेच असा जो श्रीहरि त्या श्रीहरिचे प्रेम आम्ही घेतले म्हणजे पुरे. वस्तुतः जीवशीवरूप म्हणजे परमात्मरूप आहेच असा बोध झाला म्हणजे देवभाव व त्या देवभावाचे नाशक ज्ञान हे दोन्ही मावळतात. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते सुखाचा सागर आहेत. त्यांच्यावर तरंग म्हणजे देहादिभाव पुन्हां उत्पन्न होत नाही. असे माऊली सांगतात

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading