ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.645

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६४५

मोहाचें मोहाळ सांगितले एकी । पाहतां परिपाकी मोहाळ नाही ॥१॥ मोहिलेंची दिसे मोहामाजी रसें । नसोनियां भासे तदात्मक ॥२॥ बिजीं बीज हरि दिसोनी अविट । विटोनियां नीट कळिका फाके ॥३॥ बापरखुमादेविवरा अबोला सबळे । अवघेचि निवळे गुरुकृपा ॥४॥

अर्थ:-

एकी म्हणजे एक परमात्मस्वरुपाच्या ठिकाणी अध्यस्त असलेला जो संसार त्यामध्ये जिकडे तिकडे मोहच असतो. परंतु विचार करुन पाहिले असता. आत्मज्ञानाचा जर परिपाक झाला. तर ते मोहाचे मोहळ समूळ नाहीसे होऊन जाते. जगतामध्ये एकरुपाने परमात्मतत्त्वच दिसते वस्तुतः जगत नाही? पण ज्याचे दृष्टीने जगत् घेतले आहे त्याच्याकरता जगदाकाराने परमात्मा आहे असे म्हणावे लागते. बीजरुप अविट जो श्रीहरि तो जर दिसला तर सर्व संसाराचा वीट येऊन आत्मज्ञानरुपी कमळ उमलले जाते. माझे पिता व रखुमादेवीचे पति श्रीविठ्ठल, त्यांच्या विषयी निश्चित असे जऱ्ही बोलता येत नाही. पण गुरुकृपा झाली तर मात्र सर्व मोह जाऊन श्रीहरिची ओळख होते असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading