ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.646

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६४६

एकी म्हणे ग्रह दुजी म्हणे मोह । एकीनें सोहं सांगितले ॥१॥ कोहं वाचे वारी सोहं मतें सारी । वैकुंठीची दरी उघडली ॥२॥ ककार भेदिला मकार शोधिला । ॐ कार निमाला तये स्थानीं ॥३॥ ज्ञानदेवीं ओहं सोहं गिळिले पैं कोहं । नाहीं आम्हां मोहं कल्पनेचा ॥४॥

अर्थ:-

श्रीकृष्ण परमात्म्याविषयी गौळणी अनंत विकल्प करितात. एकीचा ग्रह असा की कृष्ण हा नंदाचा पोरं आहे. दुसरी म्हणते सर्व जीवांना मोहून टाकणारा हा मोह आहे. एकीने सांगितले तो परमात्माच आहे. त्या परमात्म्याचे सोहं म्हणजे आत्मत्वाचे चितन करुन कोहं भाव व त्याच बरोबर सोहं हेही टाकून द्यावे. कारण भोळ्या भाविक जीवांना उपासने करिता हा दिसणारा कृष्ण नव्हे तर ही वैकुंठीची दरीच उघडी केली आहे. ककाराचा भेद केला मकार शोधला. अशा स्थानीं ॐ’ कार हेच श्रीकृष्णाचे प्रतिक आहे. वस्तुतः शुद्ध परमात्मा त्याच्याठिकाणी अहं सोहं कोहं’ वगैरे काही एक नाही. ते भाव असण्याचे आम्हाला कल्पनाही नाही असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

Leave a Reply