ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.644

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा फोटो min. सार्थ गाथा फोटो min min

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६४४

सायुज्य सदन शामाचिये घरीं । हृदय कल्हरी शामतनू ॥१॥ सचेत अचेत नित्यता विरक्त । असोनी अलिप्त जन्ममरणा ॥२॥ नारायण साध्य साधक साधिता । विग्रहपूर्णता अंगी लागो ॥३॥ ज्ञानदेवीं मौनी गुणग्रास धाम । सर्वत्र आराम हरि माझा ॥४॥

अर्थ:-

शामसुंदर श्रीकृष्ण परमात्म्याच्या ठिकाणीच सायुज्य मुक्तिचे घर आहे. तोच माझ्या हृदय कमळांतही आहे. जड चेतन पदार्थ त्याचे ठिकाणी भासणारी नित्यता आणि त्या विषयासंबंधी उत्पन्न होणारे वैराग्य हे सर्व त्याचे ठिकाणी असून पुन्हा तो जन्ममरणदि धर्मापासून अलिप्त आहे. साधक नारायणाला ध्यान करुन घेत असता तो नारायणच त्याला ध्यानाकरता मूर्तरुप धारण करतो. ज्याच्या स्वरुपाचे वर्णन करता येत नाही. म्हणजे ज्याच्याबद्दल मौन धरावे लागते असा तो सर्वगुणनिधान माझा श्रीहरि परमात्मा सर्वत्र भरला आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading