ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 592

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-३रे, श्रीनिवृत्ती व श्रीज्ञानदेव यांचा संवाद अभंग ५९२

ऐके तूं ज्ञाना सुख विश्रांति रूपा । हरिरूप दीपा पाहे ऐसा ॥१॥ चित्तवृत्तीचिया आदिमध्य अंतीं । रूपीरूप आनंदी समरसें ॥२॥ निवृत्ति सांगे ज्ञाना योगाची धारणा । जीवशीव करणा चक्षु दृढ करी ॥३॥

अर्थ:-

हे सुखाच्या विश्रांति रूपा ज्ञानदेवा, सर्व ठिकाणी ज्ञानरूपाने परमात्मा भरला आहे असे तू पहा. चित्तवृत्तीच्या आरंभी व शेवटी एकरूपाने असणारा आनंदरूप हरीच आहे. त्याच्याशी तूं समरस हो. निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराजांना म्हणतात हे ज्ञानदेवा योगाने साध्य होणारे जे जीवेश्वराचे एकत्व त्याचे साधन जे ज्ञान ते तूं आपल्या चित्तामध्ये दृढ संपादन कर. असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading