ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 569

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
image

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-३रे, श्रीनिवृत्ती व श्रीज्ञानदेव यांचा संवाद अभंग ५६९

विश्वरूप पाहे तंव सभोवतें रूपडें । पाहे चहूकडे तोचि दिसे ॥१॥ काय करूं सये कैसा हा देव । माझा मज भाव एकतत्त्वीं ॥२॥ सम तेज पाहे तंव एकचि वो तेज । ॐकार सहज निमाला तेंथें ॥३॥ मुळींची मूळ खूण न संपडे सर्वथा । व्यापियेलें चित्ता तेजे येणें ॥४॥ स्वानुभव दिवटी उजळूनि जंव पाही । तंव एक बिंब दाही दिशा दिसे ॥५॥ ज्ञानदेव निवृत्ति हे खूण पुसत । सांगावे त्वरीत गुरूराजें ॥६॥

अर्थ:-

सर्व जगांत जिकडे पहावे तिकडे एक परमात्मा दिसतो. हे सखे काय करू? हा देवतरी पहा कसा आहे आता माझे स्वरूपही तो परमात्माच झाला आहे. त्या परमात्मस्वरूपामध्ये ॐकारही मावळून गेला आहे. त्या मूळ परमात्म-स्वरूपाच्या तेजाने माझ चित्त व्यापून टाकले आहे. स्वानुभवाचा दिवा लावून जेंव्हा मी त्या परमात्म्याला पाहू गेलो. तेंव्हा तो ज्ञानस्वरूप परमात्माच सर्वत्र दशदिशेस भरला आहे. असे मला दिसले. श्रीगुरू निवृत्तीरायांना ती परमात्मज्ञानाची खूण मला लवकर सांगावीअशी विनंती माऊली ज्ञानदेव करीत आहेत.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading