👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-१ ले, रूपवर्णन अभंग ५३
मनाचा भाव माझा खुंटला हरि ध्याने । अवघेचि येणें मने काळापिवन केले ॥ लघुम्हणो तरी सुक्ष्मही नव्हे । सूक्ष्म म्हणोंतरी अगाधही नव्हे । या काळियाची जालीं गे माये ॥ बापरखुमादेविवरू सुनीळ नीळ काळा । अवघ्या सहित गोपाळा बुडी दिधली गे माये ॥
अर्थ:-
हरिध्याना मुळे माझ्या मनाचा भाव हरिरुपच झाला म्हणजे इतर गोष्टीसाठी खुंटला व त्या रुपाने काळाला ही पिऊन टाकले मी कालातीत झालो. ते रुप लघु म्हणावे तर सुक्ष्म नाही सुक्ष्म म्हणावे तर अगाध नाही. त्या काळियाने मला त्याची करुन टाकले. मी त्या रुपात बुडी दिली तो रखुमाईचा पती व माझे पिता आहेत असे माऊली सांगतात.
Previous Post
ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 52
Next Post
ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 54
