👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-१ ले, रूपवर्णन अभंग ४४
हरपली सत्ता मुराली वासना । सांवळाचि नयना दिसतसे ॥ काय करूं माय सांवळा श्रीकृष्ण । सांगितला प्रश्न निवृत्तीनें ॥ बापरखुमादेविवरू सांवळीये तेज । सेजबाज निज कृष्णसुखे ॥
अर्थ:-
त्या सावळ्या मूर्तीला पाहिले व माझी वासना मुरोन गेली व माझी माझ्यावरची सत्ता लोप पावली. निवृत्तिनाथांनी त्याच्या बद्दल सांगितल्या पासुन मला काय झाले ते कळत नाही त्यांने मला व्यापुन टाकले आहे. माझे पिता व रखुमाईचा पती असलेल्या त्या सावळ्यारुपाने मला येवढे मोहित केले आहे की सेजे बाजे वर पहुडलो तरी तोच जाणवत राहतो असे माऊली सांगतात.
Previous Post
ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 43
Next Post
ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 45

[…] महाराज सार्थ गाथा अभंग ४३,ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग ४४,ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग […]