👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-१ ले, रूपवर्णन अभंग ४३
नवल देखिले कृष्णरूप बिंब । सांवळी स्वयंभ मूर्ति हरीची ॥ मन निवाले समाधान जालें । कृष्णरूपे बोधले मन माझें ॥ बापरखुमादेविवरू सांवळा सर्व घटी । चित्त चैतन्या मिठी घालीत खेवो ॥
अर्थ:-
त्या सावळ्या कृष्णाची स्वयंभु मूर्ती मी पाहिली व मला त्याचे नवल वाटले. त्या कृष्णरुपाच्या बोधामुळे माझे समाधान झाले व मन शांत झाले. तो रखुमाईचा पती व माझे पिता सर्वांमध्ये चैतन्यरुपाने असुन त्याला मी मिठीत कवळुन घेत आहे. असे माऊली सांगतात.
Previous Post
ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 42
Next Post
ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 44

[…] महाराज सार्थ गाथा अभंग ४२,ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग ४३,ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग […]