👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.
प्रकरण :-११ वे, योग अभंग ४२१
स्वरूपाचे ध्यानीं निरंजन पाहिलें । डोळ्याने दाविलें चराचर ॥१॥ आतां माझें नयन नयनीं रिघों पाहे । नयना नयनीं राहे नयनची ॥२॥ ज्ञानदेवा नयन निवृत्तीने दाविला । सर्वांठायीं झाला डोळा एक ॥३॥
अर्थ:-
आत्मस्वरूपाचे ध्यान करून शुद्ध ब्रह्मस्वरूप मी पाहिले त्यामुळे सर्व चराचर मला ब्रह्ममय दिसू लागले. आतां मी ब्रह्मरूप आहे ही वृत्तीही मावळून गेली. त्यामुळे मी, परमात्मा व त्याचे ज्ञान ही त्रिपुटी नाहीसी होऊन गेली. निवृत्तीरायांच्या कृपेने मला दिव्य दृष्टि प्राप्त झाली. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.
Previous Post
ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.420
Next Post
ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.422
