👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.
प्रकरण :-११ वे, योग अभंग ४२०
आत्मा पूर्णपणीं लक्ष सोहं स्मरणीं । लक्षासी उन्मनी आणा बा रे ॥१॥ नरदेहाचे सार्थक सद्गुरूचरणीं । महाकारणासरी चौथा देह ॥२॥ ज्ञानदेव म्हणे सदगुरूकृपेनें । नित्यानित्य रूपें शोध करा ॥३॥
अर्थ:-
आत्मा सर्वव्यापक असून तोच माझे स्वरूप आहे असे चिंतन करून मनाचा नाहीसा करा. हीच ‘तुर्या’ अवस्था होय. हिलाच महाकारण चौथा देह म्हणतात सद्गुरू कृपेने विचार करून देहाचे सार्थक करून घ्यावे असे माऊली ज्ञानदेव सांगतात.