ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.252

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २५२

वृंदावनी वनमाळी । खेळे गोपीसी धुमाळी । मदन मेचूची नवाळी । रसाकाळी मनोहर ॥ तयाचे करी पां स्मरणु । आळसु न करी अंत:करणु । भीतरलीया सुमनपणु । निहारण होईल ॥ बरवेपणाचेनि मिसें । देवानें वाणीया सौरसें । जडत्व फिटेल तयासरिसे । रसने ऐसे चुको नको ॥ तरी तू हा देवो न्याहाळी पां । पिसाटपण फिटेल बापा । पावन होशी परमस्वरुपां । नेत्रीं ऐसा चुकों नको ॥ वेगी देऊनियां निविजे । ऐसे दैव कै लाहिजे । जरी तो हदयीं ध्याईजे । तै पाविजे अंगसुखा ॥ मन भ्रमर येकी हेळा । जैसे पावे पदकमळा । बापरखुमादेविवरा विठ्ठला । होईल जवळा सौरसु ॥

अर्थ:-

वृन्दावनामध्ये भगवान श्रीकृष्ण गोपी बरोबर खेळ खेळत असता, मदनाची पर्वा न करता, शृंगार रसांत फार मनोहर दिसत होते. त्या भगवान श्रीकृष्णचे आळस न करता अंतःकरण पूर्वक स्मरण करावे. त्याचे स्मरण केले तर अंत:करणातील सर्व दोष जाऊन त्याला फुलपण प्राप्त होईल. त्याच्या ह्या चांगुलपणाने आनंदाने त्या देवाचे नांव घेतलेस तर लागलीच तुझे जडत्व नष्ट होई. म्हणून हे जिव्हे त्याचे नामस्मरण करण्यास चुकू नका. त्या देवाचे रूप पाहिले तर प्रपंचाच्या ठिकाणी असलेले सत्यपणाचे वेड फिटून पावनरुप होशील म्हणून हे डोळ्यानों त्याचे रुप पाहण्यात चुकु नका.जर हृदयांत त्याचे ध्यान केले तर सगुण सुखास प्राप्त होशील. अरे असे भाग्य तुला केंव्हा प्राप्त होणार. ज्याप्रमाणे भ्रमराला दैवाने कमळाची प्राप्ती होते त्याप्रमाणे मनाला जर श्रीहरिच्या पदकमलाची प्राप्ती झाली. तर ते माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल तुझ्या हृदयांत आनंदाने प्रगट होतील. असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading