ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.251

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २५१

त्रिभुवनापरतें दाविसी दुरी । आधी तूं आपुली शुध्दी करी । उदयो अस्तु कवणिये घरीं । पिंडा माझारी सांग बापा ॥ जागृती मध्ये कवण जागत । सुषुप्ती मध्ये कवण निद्रिस्त । दोघे भ्रमलिया स्वप्न देखत । जीव कीं मन सांग पा रे ॥ जागृती वरुन काढी चेतना । सुषुप्ती मध्ये रिघता ज्ञाना । दोन्ही चेइलिया जाणता स्वप्ना । मग अनुवादती कवण ॥ इंद्रिये सुत्र दारें दाटली । जागत होती ती काय झाली । सांग पां कवणे ठायी लपाली । मग मिळाली कवणे ठाई ॥ शब्दांते नाइकती श्रवण । पाहात पाहात डोळे झाले हीन । नासाग्री ठेवूनियां सुमन । परी नेणती परिमळा ते ॥ पाहे पां येथे अनुवाई काईचा । मी माजी हारपली खुंटली वाचा । ज्ञानदेव म्हणे सद्गुरू साचा । अढळपदी बसविले ॥

अर्थ:-

परमात्मस्वरूपाचा शोध करतांना तो त्रिभुवनाच्या पलीकडे आहे. असेमागील तर तू आपल्या आत्मस्वरूपाची शुद्धी आपल्या शरीरातवरून पहा. अरे तुझ्या शरीरात ज्ञानाचा उदयास्त होतो. तो कोठे होतो. जागृतीत जागा कोण असतो. सुषुप्तीत निजतो कोण. या दोन्ही अवस्थेचा लोप झाला असता स्वप्न पाहाणारे मन का जीव सांग बरे. तसेच जागृती व झोप या दोन्ही अवस्था गेल्या असता स्वप्नांत जो अनुभव येतो त्याचा अनुवाद जागृतीत कोण करतो ते सांग.इंद्रिये ही जागृतीतील आपआपल्या विषया मध्ये नेमलेली कामे करीत होती.ती सुषुप्तीत कोठे लपली. पुन्हा जागृतीत कोठून आली सुषुष्प्ती अवस्थेत त्या इंद्रियांची काय स्थिती होते पहा. कान शब्द ऐकत नाहीत. डोळे रूप पाहात पाहात लीन होतात. नाकावर फुले ठेवली तरी ते वास घेत नाही. सुषुप्तित जर मी, माझा हा भाव खुटल्यामुळे वाचा बंद झाली होते. तर अनुवाद कसा होणार पण ही सर्व ज्याच्या सत्तेवर व्यवहार करतात तो परमात्मा मात्र होता. अशा त्या अढळरूप परमात्म स्वरूपांवर माझ्या श्रीगुरू निवृत्तिरायांनी मला बसविले म्हणजे मला यथार्थ आत्मज्ञान दिले असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading