👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-१ ले, रूपवर्णन अभंग २०
सर्वादि सर्वसाक्षी तो । विश्वंभर खल्विद तो गे बाई ॥ आनंदा आनंदु तो । प्रबोधा तो गे बाई ॥ राखुमादेविवरू तो । विटेवरी उभा तो गे बाई ॥
अर्थ:-
विश्वाचे पोषण करणारा तो सर्वांचा आदि आहे व तोच सर्वाला साक्षही आहे. तो आनंदाचा आनंद व ज्ञानाचे ज्ञान आहे. व तोच वीटेवर येऊन उभा असलेला रखुमाईचा पती आहे असे माऊली सांगतात.
Previous Post
ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 19
Next Post
ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 21
