ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 21

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-१ ले, रूपवर्णन अभंग २१

श्रुतिस्मृति वचन तो । गुह्यागुह्य तो गे बाई ॥ जागता निजता तो । निज चेवविता तो गे बाई ॥ परात्परा तो । रखुमादेविवरू तो गे बाई ॥

 अर्थ:-

श्रुती व स्मृतीनी सांगितलेली वचने तोच असुन तोच गौप्याचे गौप्य आहे म्हणजेच गुप्ताचे गुप्तत्व आहे. ज्ञानाने जागवणारा व अज्ञानामुळे झोपवणारा तोच असुन तो जीवाला चेतवणारा (चैतन्य रुप)ही तोच आहे. मायेच्या पलिकडील तोच रखुमाईचा पती आहे असे माऊली सांगतात.

No comments yet

Leave a Reply