ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.173

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-७ वे, बाळक्रीडा अभंग १७३

माथे टंकित बाह्या पसरित । डांगाचे आधार घेती ॥धृ॥ एक म्हणती आम्ही उचलिला पर्वत । बहुत मिळोनी काये नव्हती रे ॥ बाहे कडाडित मनगटें लचकत । म्हणोनी उठिले अवघे रे ॥ तयामाजीं असतां न दिसे । समर्थ थोर तुझी माव रे ॥ काळु आतुडे परी वेळु नातुडे । म्हणोनी रक्षिले सरळां रे ॥ बापरखुमादेविवरू विठ्ठल साचा । म्हणोनी रक्षिले आम्हां रे ॥

अर्थ:-

गोवर्धन पर्वत आम्ही डोक्याचा व हाताचा आधार देत उचलला असे त्या भगवंताचे सामर्य्थ लक्षात न घेता ते बोलू लागले. आम्ही सर्वांनी तो उचलला असे म्हटले तर काय झाले या गडबडीत काहीचे दंड मोडले मनगट लचकले हे पाहून काहीजण उठलेच नाहीत. तरी तो पर्वत देवाने एका करंगळीवर उचलला हे कोणाच्या लक्षातच आले नाही. काळच आला होता पण वेळ आली नव्हती म्हणून सर्वांचे रक्षण झाले. माझे पिता व रखुमाईचे पती श्रीविठ्ठल यांनी आमचे रक्षण केले असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading