ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.174

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.
प्रकरण :-७ वे, बाळक्रीडाअभंग १७४

कल्पद्रुमातळी ब्रह्म पंजाळले कैसें । दिसते सुनीळ तेज गे । मज पाहातां वेणु वेदध्वनि नाद । उमटताती सहज गे बाईं ये ॥१॥ आनंदे गोपाळ गोधनै राखे । सीतळ यमुनेच्या पाबळीं । कर्मकाठी करी घेऊनियां वळी । त्या देतुसे पांचाच्या मेळी गे बाई ये ॥घु. ॥ ऐसा जिकडे तिकडे उभा राहोनि बाहो । हणितो थोरेनि तयांचिया कर्मा । हो कोपतसे निवृत्ति । काय पुरवील येवढे तप गे बाई ये ॥२॥ गोवळेपणाचेनि वेषें । अमरी सेविजे ऐसे बोलताती सवंगडे । येरुनी येराचिया उच्छिष्टा झोंबती । नेणो तया काय जोडे गे बाईं ये ॥३॥ मुनिजनां स्तवितां संतोष न पवे । तो हुमली घेतां हांसे । ब्रम्हादिकां बोलाचीं अक्षरें । कोण जाणे प्रेम कैसेगे बाई ये ॥४॥ ऐसा साही दर्शनां वर्णितां पवाडु नाहीं । आणि गोवळेपणे वेष नवल सांगो मी कायी । बापरखुमादेविवर विठ्ठलु सेविलिया । वांचूनि नेणवे केलिया कांही गे बाईं ये ॥५॥

अर्थ:- 
कल्पवृक्ष तळी तेजःपुंज सुनीळ कृष्णरूप कसे बसले आहे ते पहा. हे जीवरुप सखे त्यानी वाजवलेल्या वेणूतून वेद ध्वनींचे नाद उमटतात असे मला वाटते. युमनातिरी ते गोपाळ आनंदाने ती गोधने राखत आहेत.इंद्रिय रुप गाईना कर्माची काठी लाऊन तो पंचकांच्या ठिकाणी त्यांचा मेळ करतो. बाहे उभी करुन इकडे तिकडे तो कृष्ण जीवरुप गायींना कृतकोपाने कर्मकाठीने मारत अ़सुन त्यांच्या पुर्व कर्मांची निवृती करित आहे तसे व्हायला त्यांचे काय पुर्वजन्मीचे तप पुरणार आहे? स्वर्गीचे अमर गोपवेश घेऊन त्याचे उष्टे खायला मिळावे म्हणुन तिकडे गोकुळात आले आहेत परंतु ते त्यांना प्राप्त होत नाही.मुनिजनांनी केलेल स्तवनाने तो संतोष पावत नाही उलट संवगड्यांनी त्याच्याशी केलेली हमरीतुमरी मुळे तो आनंदात हसतो. ब्रह्मादिकांचे बोलांच्या अक्षरात प्रेम आहे असे तो जाणत नाही. असे ज्याचे वर्णन करायला साही शास्त्र धजावत नाहीत. तो गोवळ्या वेशातील कृष्ण त्याचे नवल मी काय सांगु. माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांचे सेवा केल्याशिवाय इतर सांधनानी जाणता येत नाही असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading