ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 147

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

 ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-४ रे, नाममाला अभंग १४७

पन्नासाअक्षरीं करिसी भरोवरी । शेखीं तुझे तोंड तुज वैरी रया ॥ यापरी नामाची वोळ मांडुनी । संसार दवडूनि घालीं परता । रकारा पुढे एक मकार मांडी कां । उतरसी समतुका शंभूचिया । बापरखुमादेविवरा विठ्ठलु हदयीं’ । आपली आण वाही त्रिभुवनीं रया ॥

अर्थ:-

वर्णाक्षरातील र व म ही अक्षरे सोडली तर इतर अक्षरांना वापरुन केलेले कोणते ही शब्द त्या दोन अक्षरांची बरोबरी करु शकत नाहीत व त्या इतर शब्दामुळे तुझे तोंड तुझे वैरी बनेल. म्हणुन तु रामनामाचा जप करुन संसार सोडुन दे. त्या रामनामाच्या जपामुळे तु प्रत्यक्ष शिवशंकरांची बरोबरी करशील. माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठलनामाला हृदस्थ करुन त्या शिवाय दुसरे काही करणार नाही अशी शपथ घे असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading