👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-४ रे, नाममाला अभंग १४८
सकळ नेणोनियां आन । एक विठ्ठलुची जाण ॥ पुढत पुढती मन । एक विठ्ठलुचि जाण ॥ हेची गुरुगम्याची खूण । एक विठ्ठलुचि जाण ॥ बुझसी तरी बुझ निर्वाण । एक विठ्ठलुची जाण ॥ हेचि भक्ति हेंचि ज्ञान । एक विठ्ठलुचि जाण ॥ बापरखुमादेविवरा विठ्ठलचि आण । एक विठ्ठलुचि जाण ॥
अर्थ:-
इतर काही जाणण्या पेक्षा त्या एका विठ्ठलाला जाण. हे मना पुन्हा पुन्हा सांगतो त्या विठ्ठलाला जाण. गुरुकडुन जाणणे म्हणजे त्या विठ्ठलाला जाणणे आहे. निर्वाण जाणायचे असेल तरी तु विठ्ठलाला जाण. भक्ती व ज्ञानासाठी ही विठ्ठलालाच जाण.माझे पती व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांची शपथ घेऊन सांगतो फक्त त्या विठ्ठलालाच जाण असे माऊली सांगतात.