ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 872

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
  प्रकरण :-१४ वे, रूपके पाळणा अभंग ८७२

पाळण्याची परी सांगेन आतां । पाळण्या सान्हुलें देहेंविण बोभातें ताता ॥१॥ तेथें जनकु नव्हे जननी नव्हे । बालक नवे होय माझेवीण ॥२॥ तेथें तेल सारूनी अभ्यंग केला । बालक पुसिला अंबरवर्णे ॥३॥ बापरखुमादेविवरू अनुभवीत झाले । ते निजरूप पावलें परब्रह्मीं ॥४॥

अर्थ:-

आतां तुम्हाला पाळण्याचा प्रकार सांगतो त्या परमात्मरूपी पाळण्यांत ‘सान्हुलें’ म्हणजे परिछिनभाव घेतलेला जीव वास्तविक आत्मदृष्टीने त्याच्या ठिकाणी देहादिकांचा संबंध नसतांना उगीच ओरडतो. वास्तविक आत्मस्वरूपाला बाप नाही, आई नाही, व बालकपणाही नाही. अशा आल्याची सिद्धि माझेपणा नसेल तर होते. अशा स्वरूपाच्या बालकाला आत्मरूप प्रतितीचे तेल लाऊन वैराग्याचे स्नान घातले. आणि विचारांच्या सुंदर वस्त्रानी पुसिले. तेंव्हा माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांचा अनुभव घेते झाले. व त्यामुळे ते बाळ परमात्मरूपाला प्राप्त झाले.असे माऊली सांगतात.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *