ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 126

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-४ रे, नाममाला अभंग १२६

समाधीचे साधन । तें रामनाम चिंतन । चित्ता सुखसंपन्न हर्ष । जीवन केला ॥ कोटी तपाचिया राशी । जोडती रामनामापाशीं । नाम जपतां अहर्निशीं । वैकुंठपद पाविजे ॥ हेंचि धृवासी आठवलें । उपमन्ये हेंचि घोकिलें । अंबऋषीनें साधिलें । रामकृष्ण उच्चारणीं ॥ पांडवांसि सदा काळी । कृष्ण राहिला जवळी । ज्ञानदेव हृदयकमळी । तैसाचि स्थिरावला ॥

अर्थ:-

 रामनाम चिंतन हे समाधीचे साधन आहे. त्यामुळे चित्ताला सुख व जीवाला हर्ष झाला.रामनामाच्या जपाने कोटी तपाच्या राशी जोडता येतात. व हे नाम अहर्निश घेतले तर वैकुंठ प्राप्त होते.हे रामकृष्णनाम हे ध्रुव व उपमन्यु ह्यांनी घेतले. ह्याच कृष्णनामाने तो पांडवापाशी राहिला व तसाच तो माझ्या हृदयकमळात तो स्थिरावला आहे असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading