ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.935

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड. 
प्रकरण :-१४ वे, रूपके पाईक अभंग ९३५

पाईका मोल नाहीं देशील तें काई । पाईक न मागे कांहीं भोगजात ॥१॥ देशील तें काई न देशील तें काई । पाईक न मागें कांहीं तुजवांचोनी ॥२॥ बापरखुमादेविवर विठ्ठलाच्या पायीं । पाईका मोल नाहीं तैसें जालें ॥३॥

अर्थ:-

तुझ्याशी ऐक्यभावाने असणाऱ्या पाईकपणाचे मोलच नाही.तूं काय देणार? येऊन जाऊन देणार कांही भोग्यपदार्थ.ते तर मी मुळीच मागत नाही. तूं देणार काय आणि न देणार काय? हा तुझा पाईक तुझ्यास्वरूप प्राप्तीशिवाय दुसरे काहीच मागत नाही.माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांच्या पायाची आनंदाने सेवा करणारा पाईक. त्याला मोलच नाही असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading