ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.934

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
image

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-१४ वे, रूपके पाईक अभंग ९३४

एकुची एकला जाला पैं दुसरा । एकीमेकी सुंदरा खेळविती ॥१॥ माझीये कडीये तान्हा तुझीये कडीये कान्हा । देवकी यशोदा विस्मो करिती मना ॥२॥ बापरखुमादेविवरू आवडे मना । जगत्रजिवनु कान्हा बाईयांनो ॥३॥

अर्थ:-

सत् चित् आनंद या रूपाने श्रीकृष्ण परमात्मा एकटा एकच असता आपल्या दोन्ही मातेस आनंद देण्याकरिता आपण दुसरा झाला. त्या दोघींनी दोघा कृष्णास कडेवर घेऊन खेळवू लागल्या. आणि मोठ्या आश्चर्याने एकमेकीस म्हणतात की आज माझ्या कडेवर तान्हा आणि तुझ्या कडेवरही कान्हा काय चमत्कार आहे हा.माझे पिता व रखुमादेवीवर जे त्रैलोक्याचे जीवन आहेत ते श्रीकृष्ण आम्हांस आवडतात अशा त्या दोघी एकमेकीस म्हणत आहेत.असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading