ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 89

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-३ रे, नामसंकीर्तन महात्म्य अभंग ८९

यश किर्ती वानू नेणे मी वाखाणू । रामकृष्ण आम्हां सणू नित्य दिवाळी ॥ नरहरी रामा नरहरि रामा । पुराणपुरुषोत्तमा हरि गोपाळा ॥ या नेमी अक्रूर बोधला परीक्षिति उपदेशिला । अर्जुनाशी जाला साहाकारी ॥ ज्ञानदेव म्हणे नामेवीण जो नरु । तो होय भूमीभारु ये संसारी ॥

अर्थ:-

भगवंताचे यश कीर्ती सारखे षडगुण आहेत त्याची वाखणी मी करु शकत नाही. रामकृष्ण नामाचा उच्चारच आम्हाला नित्य दिवाळीचे सुख प्रतिदिन देतो. नरहरि, राम, पुराणपुरष, हरि, गोपाळ या सारख्या त्याच्या नांवामुळे परिक्षितीला उपदेश व अक्रुराला बोध झाला.व तेच नाम जपल्याने तो अर्जुनाचा साह्यकर्ता झाला. जो नर ह्या नामाचा अंगिकार करत नाही तो भूमीला भार आहे असे प्रतिपादन माऊली करतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading