ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 875

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-१४ वे, रूपके पाळणा अभंग ८७५

शून्य नाहीं निरशून्य नाहीं । तेथें पाळणा पाही लावियेला ॥१॥ जातिवीण बाळ उपजलें पाहीं । तेथें परिये देते माय तेही नाहीं ॥२॥ बापरखुमादेविवरू विठ्ठलीं पाळणा नाहीं । तेथे मी बाळ पाहीं पहुडलों ॥३॥

अर्थ:-

ज्या ठिकाणी शून्य म्हणजे माया नाही.किंवा निरशून्य म्हणजे मायेचा अभावही नाही. अशा रितीचे जे परमात्मस्वरूप हाच कोणी एक पाळणा परमात्मस्वरूपांच्या ठिकाणी आहे. परमात्मस्वरूप पाळणा ठरल्यानंतर त्यांत निजणारा परमात्मस्वरूपच पाहिजे. म्हणून जातिरहित उत्पन्न झालेले बाळक निजलेले आहे. त्या ठिकाणी त्या पाळण्याला झोके देणारी त्याची मायही कोणी नाही.परमात्मस्वरूपांचा पाळणा हे रूपक असून त्या पाळण्यांत निजणारे बाळ म्हणजे मुमुक्षु या रूपकाने आहे.मा झे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांचे ठिकाणी पाळणा नाही. अशा विठ्ठल स्वरूपाच्या ठिकाणी मी बाळक होऊन, म्हणजे मुमुक्षु होऊन पहुडलो असे माऊली सांगतात.अर्थ:-

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading