👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१२ वे, स्वरूपस्थिती अभंग ८३६
आतां आपणया आपण विचारी । सेखी प्रकृती ना पुरूष निर्धारी रया ॥१॥ आतां प्रेतांचे अळंकार सोहोळले । की शब्दज्ञानें जे डौरले । दीप न देखती कांहीं केले । ऐसें जाणोनियां सिण न मानिती । प्रतिष्ठा भोगिती भले रया ॥२॥ बापरखुमादेविवरा विठ्ठला देखतांचि जे बोधले । तेणें सुखें होउनी सर्वात्मक जें असतांची देहीं विस्तारलें । येणे निवृत्तिरायें खुणा दाउनी सकळ । बोलतां सिण झणे होईल रया ॥३॥
अर्थ:-
आतां आपण आपल्या स्वरूपांचा विचार केला तर असे दिसून येईल की आपण शेवटी पुरूषही नाही की प्रकृतिही नाही. शब्दज्ञानी लोकांचे बोलणे प्रेतावरील अलंकारांनी शृंगारल्याप्रमाणे आहे. ते उगीच आपल्या शब्दज्ञानाची प्रौढी मिरवितात. काही केल्याने परमात्मस्वरूप दीप पाहात नाहीत. उलट शब्दज्ञानांचाही ते शीण मानीत नाहीत. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यास पाहातांच ज्यांना बोध होतो. त्यांनाच सर्वात्मकाची प्राप्ती होऊन परमात्मा देहांत भरून राहिला आहे अशी खात्री होऊन इतर संभाषणाचा खरोखर वीट येतो. अशी खूण मला निवृत्तीरायांनी दाखविली. असे माऊली सांगतात.
