👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-२ रे, हरिपाठ अभंग ७५
हरिवंशपुराण हरिनाम कीर्तन । हरिविण सौजन्य नेणें कांहीं ॥१॥ त्या नरा लाधलें वैकुंठ जोडलें । सकळ घडलें तीर्थाटन ॥२॥ मनोमार्गें गेला तो तेथे मुकला । हरिपाठीं स्थिरावला तोचि धन्य ॥३॥ ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी । रामकृष्णीं आवडि सर्वकाळ ॥४॥
अर्थ:-
हरिचे गुणवर्णन असलेले हरिवंश पुराण अभ्यासुन जो कीर्तन करतो त्याला हरि वाचुन काहीच आवडत नाही. तसे केल्याने त्या नराचे सर्व तीर्थभ्रमण होऊन तो वैकुंठ प्राप्त करतो. पण मन प्रमाणे वागणारा ह्या लाभाला मुकतो. जो हरिनामात रमला तो मुक्त होतो.हरिनामाची जोडी करत राहणाऱ्याला त्याची गोडी लागतो व त्याला रामकृष्णनाम सतत प्राणप्रिय होते असे माऊली सांगतात.
