ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.746

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-८ वे, श्रीनिवृत्तीप्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७४६

चौदा भुवनीं चौघा भुलविलें । वेव्हार नासिलें स्मृति व्यालौ गे माये ॥१॥ अवघे धन देऊनि मज निधन केलै । ऋण मागावया धाडिलें नये ते ठायीं ॥२॥ ऐसे श्रीनिवृत्ति शब्दे अगाध जालें । माझें मीपण गेलें धन देखा ॥३॥ बापरखुमादेविवरू विठ्ठलु साक्षी । तो मज पारखी घेऊनि गेला ॥४॥

अर्थ:-

चतुर्दश भुवनामध्ये परमात्म्याचा शोध करण्याकरिता गेलेल्या चारी वेदाला त्या परमात्म्यानी भुलवून टाकले. म्हणजे परमात्मस्वरूपाविषयी वेदाचा व्यवहार चालेनासा झाला. पण अंतःकरण शुद्ध झाले तेंव्हा त्या निर्मळ अंतःकरणात त्या परमात्म्याची आपोआप स्मृति झाली. म्हणजे अंतःकरणात प्रगट होऊन माझ्या मीपणाला व्यापून टाकले. आपले सर्व धन मला देऊन म्हणजे मला परमात्मरूप करून देहात्मभावनहे जे माझे पूर्वीचे धन होते. ते सगळे निधन केले म्हणजे नाहीसे करून टाकले. परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी ऋण मागायला गेले असतां पुन्हा देहभावावर येणे होत नाही. तर तद्रुपस्थिति होते. अशी श्रीगुरू निवृत्तिरायांच्या उपदेशाने मी अगाध झाले. म्हणजे परमात्मरूप झाले. आणि अनात्मपदार्थाच्या ठिकाणी मी आणि माझे असे जे धन होते. ते सगळे गेले. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल सर्व जीवांचे साक्षी आहेत. त्यांच्याहून परकी असलेली मी त्या मला आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी घेऊन गेला असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading