ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.747

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
  प्रकरण :-८ वे, श्रीनिवृत्तीप्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७४७

अवघड तें एक घडलें माझ्या अंगी । तीही ऋण चौघीं मज देवविलें ॥१॥ ज्यासी दिधलें त्यासी नांव पैं नाहीं । जया रूप नाही त्यासी ऋण देवविलें ॥२॥ निवृत्ति गुरूनें अधिक केलें । निमिष्यमात्रीं दाविलें धन माझें ॥३॥ येणें रखुमादेविवरू विठ्ठलें होतें तें आटिलें । सेखीं निहाटिलें निळारंभी ॥४॥

अर्थ:-

मनुष्यशरीरांत परमात्मप्राप्ती होणे हे अत्यंत अवघड आहे. परंतु ते आज माझ्या शरीराच्या ठिकाणी घडून आले. संचित क्रियमाण प्रारब्ध या तिघांच्या प्रेरणेने चित्त चत्तुष्टयाने पत्करलेला देहात्मभाव हेच कोणी ऋण परमात्म्याला देवविले. पण चमत्कार असा झाला की ज्या परमात्म्याला ऋण देवविले त्याला नाव नाही, रूप नाही, कांही एक नाही. त्याला ऋण देवविले. असे माझे सर्वस्व धन देहात्मभाव तो परमात्मस्वरूपाच्या ठिकाणी दिला. वस्तुतः ते परमात्मस्वरूपच खरे धन होते. तें विसरून मी देहात्मभावालाच माझे धन मानीत होतो. परंतु माझे खरे धन जें आत्मस्वरूप ते एका क्षणांत निवृत्तिनाथांनी मला दाखविले. त्यांच्या प्रसादाने रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठलांनी माझे देहात्मभावाचे धन नाहीसे करून निरालंब परमात्मस्वरुपाचे ठिकाणी मला पोहोचते केले. असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading