ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.741

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-८ वे, श्रीनिवृत्तीप्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७४१

समसुखें शेजे निजोनियां काज । साधिलेंसे बीज निवृत्तिरायें ॥१॥ पृथ्वीतळ शय्या आकाश प्रावरण । भूतदया जीवन जीवभूत ॥२॥ निजी निज आली हरपल्या कळा । ब्रह्मानंद सोहळा गुरूशिष्यीं ॥३॥ ज्ञानदेवीं काज निरालंब रूप । तळिवरी दीप सतेजला ॥४॥

अर्थ:-

श्री निवृत्तिरायांनी जे बीज प्राप्त केले, तेच साम्यसुख असून त्या शेजेवर मी निजलो आहे. शय्या पृथ्वी आहे, आकाश पांघरूण आहे. भूतदया हे जीवाचे जीवन आहे. अशा आत्मस्वरूपावर मला झोप लागली असून त्या झोपेत असणारा ब्रह्मानंदाचा सोहळा मी भोगित आहे. आपल्या स्वरूप महिमेवर प्रतिष्ठित असणे यातच माझे सार्थक आहे. आणि त्या आत्मस्वरूपाचा प्रकाश चहूकडे व्याप्त आहे. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading