ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.742

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-८ वे, श्रीनिवृत्तीप्रसादाने प्राप्त झालेली स्थिती अभंग ७४२

साकारू निराकारू वस्तु सद्गुरु आमुचा । तेणें या देहाचा केला उगऊ ॥१॥ उगविलें उगविलें मायेंते निरसिलें । एकत्व दाविलें त्रिभुवन रया ॥२॥ सत्रावी दोहोनी इंद्रिया सौरसु । गुरूमुखें उल्हासु भक्तिमहिमें ॥३॥ ज्ञानदेव म्हणे मी नेणता प्रपंची । तोडली मोहाची पदवी आम्हीं ॥४॥

अर्थ:-

आमचा श्रीगुरू हे सगुण व निर्गुण परमात्म्याचे मूर्तिमंत स्वरूप असून त्यांनी आमच्या तिन्ही देहाचा उलगडा करून दाखविला. सत्रावी जी जीवनकला हीच कोणी कामधेनु तिचे गुरूमुखाने धार काढून भक्तिप्रेमानंदाचा महीमा सर्व इंद्रियांना प्राप्त करून दिला. आम्ही गुरूकृपेने प्रपंचाच्या मोहाची बेडी तोडून टाकून परमानंद स्थितिला प्राप्त झालो. असे माऊली ज्ञानदेव सांगता

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading