ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.662

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६६२

अनुभव जाला प्रपंच बुडाला । आपुला आपण देखिला सोहळा गे माय ॥१॥ आपण जाणतां आपण मी जालिये । आपणापैं विसरलिये नेहटी वो माये ॥२॥ आपुला म्हणोनि अवघा आलिंगिला । अवघा देखिला अवघेपणें वो माये ॥३॥ ऐसें जाणोनी ठकलें ठकोनियां ठेलें । रखुमादेविवरें विठ्ठलें वो माय ॥४॥

अर्थ:-

यथार्थ अनुभव आल्यानंतर सर्व प्रपंच मुळीच नाही असा निश्चय होतो. वास्तविक ते ज्ञान आपला असलेल्या आपल्या कूटस्थरुप आत्म्याच्या सुखाचा सोहळा आपण म्हणजे अंतःकरणातील आभासाने पाहिला असे होईल.आपण जाणता आपण, या दोन आपण शब्दापैकी पहिल्या आपण या पदाचा अर्थ मी आपल्याला म्हणजे जो कूटस्थरुप परमात्मा त्यास जाणल्यामुळे आनंदाचा. सोहळा होतो. दुसऱ्या आपण शब्दाचा अर्थ जीव आहे.आता जीवाभासाचा विसर आपोआपच पडतो.अशा रितीने जीवभाव जाऊन परमात्मभाव प्रगट झाला. आणि त्या परमात्मवृत्तिने जगाकडे पाहू लागला तर तो त्या जगांत अनंतरुपाने भरलेला दिसेल. रखुमादेवीचे पती श्री विठ्ठलास मी परमात्मरुपाने जाणल्यामुळे मी जीवस्वरुपाला मुकलो व स्वतःसिद्ध परमात्मरुप होऊन राहिलो असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading