ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.661

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६६१

विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले । अवघेचि जालें देहब्रह्म ॥१॥ आवडीचे वालभ माझेनी कोंदाटलें । नवल देखिले नभाकार गे माये ॥२॥ बापरखुमादेविवरू सहज निटु जाला । हृदयीं नटावला ब्रह्माकारें ॥३॥

अर्थ:-

सर्व विश्व रात्रंदिवस ज्या ब्रह्मप्राप्तीची इच्छा करीत आहे. तें ब्रह्म माझ्या मनांत प्रगट झाल्यामुळे माझा सर्व देह ब्रह्मरूप झाला. तें माझे आवडीचे प्रेम माझ्या रूपात कोंदून गेले. तें आकाशस्वरूपी परमात्मचैतन्य मी पाहिले.याचे मोठे नवल वाटते.माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल ते लोकांना भेटण्याला फार कठीण आहेत परंतु मला सहज प्राप्त झाले आणि हृदयांत उत्तम प्रकारे ब्रह्माकार होऊन राहिले आहेत. असे माऊली सांगतात

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading