ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.650

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६५०

दीपाचेनि तेजें पैस घेतसे माया । जाय सांगावया व्दैतभावो ॥१॥ द्वैत नाहीं अद्वैत नाहीं । ठायींच्या ठायीं कतत्त्वीं ॥२॥ तैसे रसमय तेज स्नेहार्णव बीज । छाया मोहबीज न बिंबत ॥३॥ बापरखुमादेविवरू वोतली ये कळा । न दिसोनी सोंविळा दिसे हरि ॥४॥

अर्थ:-

परमात्मस्वरूप दीपाचे प्रकाशाने सर्वत्र व्याप्ति केली आहे. हे सांगावयाला द्वैत पत्करावे लागते. वस्तुतः त्याचे ठिकाणी द्वैत किंवा अद्वैत भाव काहीच नाही. तो आपलेच ठिकाणी स्वगतादिभेद शून्य एकरूप आहे. ते आनंदस्वरूप आनंदाचे तेजोमय परमात्मजीवन व आभासरूप मोहाचे बीज आहे. परंतु ते कोणाला आकलन होत नाही. असे माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल, तोच परमात्मा सर्व पदार्थामध्ये व्यापून कोणाला न दिसतां असंगरूपाने सोवळा आहे.असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading