ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.651

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा फोटो min. सार्थ गाथा फोटो min min

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
  प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६५१

सगुणींच्या राती निर्गुणी दिवटा । सांगती चोहटा वाग् पंथ ॥१॥ वागेश्वर हरि वाचेचा वाचक । आधीचाही अर्क दीपतेजें ॥२॥ साकारी निराकार बिंबी बिंबअवतार । अवघे माजिघर बिंबलेंसे ॥३॥ बापरखुमादेविवरू ॐतत्सदाकारू । निवृत्ति निर्धारू माजीवटा ॥४॥

अर्थ:-

सर्व मायाकार्याच्या पलिकडचा असून तो परमात्मा शुद्ध ज्ञानाचे घर आहे. तसेच तो सर्व जीवांच्या हृदयांत व्यापून आहे. असे चारी वेदातील वाक्ये सांगतात. पण वागेश्वर श्रुतिमाऊली तिला बोलविणारा श्रीहरिच आहे. कारण सर्वांच्या आधी सूर्याप्रमाणे प्रकाशरूप आहे.उपाधी घेऊन तुम्ही साकार म्हणा की उपाधि टाकून निराकार म्हणा पण त्या सर्वांत श्रीहरिच प्रकाशमान झालेला आहे. माझे पिता व रखमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल, ते ॐ तत् सत् अशा । आकाराचे आहेत. त्यांच्या स्वरूपाचा निर्धार श्रीगरू निवृत्तिरायांनी मला करून दिला. असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading