ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.609

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६०९

जगासी गवसणी ब्रह्मरूपं देखिली । ते मी अंतरी पांगरलों अंतरामाजीं ॥१॥ अंतरीचे सुख अंतरीं निमालें । अंतर बैसविलें ब्रह्मपदीं ॥२॥ बापरखुमादेविवर ब्रह्मपदी देखिला । मजमाजी सामावला अद्वैतपणें ॥३॥

अर्थ:-

जगाला ब्रह्माची गवसणी आहे. असे मी पाहिले आणि त्याच ब्रह्मरूपाची गवसणी अंतःकरणांत पांघरली म्हणजे अंतःकरणांत प्रतिबिंबित झालेला आत्मा तो ब्रह्मरुप झाला. त्या ऐक्य स्थितीचे प्रथम झालेले सुख अंतरीच लय पावले. आणि अंतःकरण ब्रह्मपदाच्या ठिकाणी स्थापन केले. माझे पिता व रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल, तेच ब्रह्मपद आहेत. व तेच अद्वैतरुपाने माझ्यामध्ये सामावले असे मी पाहिले असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading