ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.608

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा,ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-४थे, ज्ञानासंबंधी उद्गार अभंग ६०८

दुधावरली साय निवडुनी दिधली । तैसी परी जाली आम्हां तुम्हां ॥१॥ घालोनी ब्रह्मे उद्गार संभ्रमें । अनुदिनी प्रेमे डुल्लतसे ॥२॥ नाठवे आशा देहावरी उदास । मीतूंपण भास चोजवेना ॥३॥ रखुमादेविवर विठ्ठली मुरोनी राहिला । तो आनंदु देखिला संतजनीं ॥४॥

अर्थ:-

दुधांमध्ये सारभूत जसी साय असते. व ती काढून जसी हातावर द्यावी त्या प्रमाणे सर्व संसारात सारभूत जो परमात्मा त्याची प्राप्ती आज आपल्याला झाली आहे. परमात्मस्वरुपाने तृप्त होऊन कृत्यकृत्यतेचे उदगार तोडांतून निघतात. आम्ही रात्रंदिवस त्या प्रेमांत डोलत आहोत.अशा स्थितीत आशेचा आठवच नाही. देहावर उदासीनता येते. आणि मी, तूं पणाचा द्वैतभाव जाणवत नाही. रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांच्या आनंदात आम्ही कसे डोलत आहोत हे एक, साधुसंतानाच माहित आहे. असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading