ज्ञानेश्वरमहाराज सार्थ गाथा अभंग क्र. 548

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानकाण्ड.
 प्रकरण :-१ ले, अद्वैत अभंग ५४८

देव नाहीं तेथें पूजी तया कोण भक्त । गुरुशी ठाव नाहीं कोणी शिष्याशी पुसत ॥१॥ सदोदीत ब्रह्म पूर्ण निराकार निर्गुण । भेदाभेद क्षीण तेथें अनुभवी हे खूण ॥२॥ आदि अंत मध्य नाही दृश्य दृष्टा दर्शन । सच्चिदानंदरूप वस्तु सनातन ॥३॥ एक तेचि अनेक झाले अनेकरुपी एक । खुण सांगे ज्ञानेश्वर जग जाणा कल्पक ॥४॥

अर्थ:-

देवच जेथे नाही मग त्याची पूजा करणारा भक्त कोण असणार? गुरुचा जर पत्ता नाही तर शिष्यांना विचारतो कोण? ब्रह्म सर्वव्यापक, निर्गुण, निराकार व सनातन असल्यामुळे त्यांत भेदाभेद मुळीच नाहीत. हे अनुभवाच्या खुणेने कळेल. ब्रह्माला आदि, मध्य व अंत हे तिन्ही नाही तसेच ते कोणाला पाहात नाही. व कोणाच्या पाहण्याचा विषयही होत नाही. अगर दर्शनही म्हणजे कोणाचे ज्ञानही नाही. म्हणजे त्रिपुटीविवर्जित आहे. ते अनादि सच्चिदानंदरुपच आहे. ते ब्रह्मतत्त्व एकच असून अनेकरूपाने प्रतीतीला येते. म्हणून जगत् काल्पनिक आहे. अशी तुम्हाला खूण सांगतो. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading