ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 538

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
image

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानकाण्ड.  
प्रकरण :-१ ले, अद्वैत अभंग ५३८

मृतिकेची खंती काय करतोसी । कोण मी नेणशी काय आहे ॥१॥ काय तुज जालें नाथिला संसार । कासयासी भार वाहतोसी ॥२॥ शुद्धबुद्धरूप तूंचि परिपूर्ण । जन्म आणि मरण तुज नाहीं ॥३॥ अविद्येच्या योगें तुज जाण भुली । अनुभवूनी किल्ली छेदी आतां ॥४॥ श्रीगुरूच्या कृपें म्हणे ज्ञानेश्वर । तरसी संसार निश्चयेंसी ॥५॥

अर्थ:-

या जड देहाविषयी खेद काय करीत बसला आहेस? मी कोण आहे? काय आहे, हे तुला कळत नाही. तुला काय अडचण वाटते? नसलेल्या संसाराची काळजी कशाला करतोस.तूं शुद्ध ज्ञानस्वरूप असून तुला जन्म मरण नाही असे तुझे पूर्ण सत्यस्वरूप आहे. पण अज्ञानाच्या योगाने तुला कशी भुल पडली आता श्रीगुरूकडून मुक्त होण्याची किल्ली म्हणजे वर्म समजून घे व संसाराचा छेद करून टाक. सदगुरूंच्या कृपेने तू संसारातून तरून जाशील.हे मी तुला खात्रीने सांगतो. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading