ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.427

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-११ वे, योग अभंग ४२७

ब्रह्मज्ञानी पुरूष तोचि ओळखावा । नयनांजनी पाहावा ब्रह्मठसा ॥१॥ देखतसे देहीं द्वैत भेदातीत । तोची धन्य संत माझे मनीं ॥२॥ त्याचे चरणोंदकी जान्हवी पवित्र । सहस्रदळावर लक्ष ज्यांचें ॥३॥ ज्ञानदेव म्हणे ऐशा योगीयाला । देखतां तयाला नमन माझें ॥४॥

अर्थ:-

ज्याच्या डोळ्यातील तेजांत ब्रह्मप्राप्तीची खूण दिसते त्यालाच ब्रह्मज्ञानी समजावे जो देही असूनही ज्याला द्वैत भेदाच्या पलीकडील परमात्म्याचे दर्शन झालेले असते तोच खरा संत असे माझ्या मनात येते. ज्या पुरुषाचे लक्ष ब्रह्मरंध्रातील सहस्रदळा वर म्हणजे परमात्म्यावर आहे. अशा पुरूषाच्या पायातील तीर्थ जान्हवी आहे असे समजा. अशा पुरुषाला पाहिल्याबरोबर त्याला माझे दंडवत असो. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading