ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.428

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  
प्रकरण :-११ वे, योग अभंग ४२८

निशी दिवस दोघे लोपले ते ठायी । निरंजन ते ठायी लक्षनी पाहा ॥१॥ रवी शशी ज्याचे तेजें प्रकाशले । नवल म्या देखिलें एक तेथें ॥२॥ नारी पुरूष दोघे एक रूपें दिसती । देखणे पारूखे तया ठायीं ॥३॥ ज्ञानदेव म्हणे शिव तेचि शक्ती । पाहता व्यक्तीं व्यक्त नाहीं ॥४॥

अर्थ:-

रात्र व दिवस असा भेद ज्याच्या ठिकाणी नाही. कारण ते स्वरूप तेजरूप म्हणजे ज्ञानरूप आहे. ते ब्रह्म तुम्ही नीट लक्ष देऊन पहा. ज्याच्या प्रकाशाने चंद्र सूर्यादिकाना प्रकाश मिळतो. अशा ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी स्त्री पुरूष असा भेद नाही व पाहाणाराही त्यामध्ये लोपून जातो.याचे मला मोठे आश्चर्य वाटते. शिवशक्ती एकरूप असल्यामुळे त्यांचामध्ये व्यक्त अव्यक्त असा भेद नाही. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading