ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र. 41

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-१ ले, रूपवर्णन अभंग ४१

सांवळेचें तेज सांवळे बिंबले । प्रेम तें घातले हृदय घटी ॥ निरालंब बाज निरालंब तेज । चित्तरस निज निजतसे ॥ आदिमध्यअंत राहिला अनंत । न दिसे द्वैताद्वैत आत्मा रया ॥ ज्ञानदेवी सोय अवघाचि सामाय । सुखदुःख माय आम्हां नाही ॥

अर्थ:-

 सावळ्या रुपाचे सावळे तेज सर्वत्र बिंबले असून ते प्रेमस्वरूप मी ह्रदयाच्या घटात घातले आहे. तो तेजाला तेज देणारा स्वयंपूर्ण आहे. अशा तेजामुळे माझे चित्तही तेजस्वी झाले. आदि मध्य, अंत, व्दैत, अव्दैत यापासून वेगळे असणारे ते अनंतरूप आहे. असा तो आमच्यामध्ये परिपूर्ण असल्याने आम्हाला सुखदुःख उरली नाहीत असे माऊली सांगतात.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

No comments yet

  1. […] ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग ४१,ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग ४२,ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग ४३,ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग ४४, […]

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading